मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे. पण ज्या महिला ही तारीख चुकवतील,1 सप्टेंबर नंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना या 3 हजार रुपयांना मुकावे लागणार आहे, असे अदिती तटकरे यांनी नमूद केले. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे,असेही त्यांनी सांगितलं.